व्हिडीओ एडिटिंग साठी अनेक app उपलब्ध आहेत. त्यापैकी kinemaster हा app मला अतिशय उपयुक्त वाटतो. या app मद्धे व्हिडीओ एडिटिंग साठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तर चला मग पाहूया, kinemaster app वापरून व्हिदिओ निर्मिती कशी करतात.
सर्वप्रथम playstore वरून kinemaster हे app डाऊनलोड करून घ्या.
app ओपन केल्यानंतर create video वर क्लिक करा.
create new वर क्लिक केल्यानंतर आपल्या नवीन प्रोजेक्ट साठी Ratio विचारतात. तुम्हाला हवा तो ratio निवडा. 16 :9 हा ratio साधारणता मोबाईलद्वारे व्हिडीओ किंवा pc साठी घेतात.
Media browser मधून हवा तो video , image ,pictures आपल्या फोन मेमरी किंवा फाईल , अल्बम यामधून घ्या.खालील screenshot पहा.
त्यानंतर app च्या dashboard वर media, layer , audio ,REC इत्यादी TAB ऑप्शन येईल.त्यातील layer वर क्लिक करा. त्यात व्हिडीओ किंवा image ला लावण्यासाठी effect ,sticker ,text , handwritting इत्यादी TAB उपलब्ध होतील. हवी ती TAB निवडा. ok करा.ऑडीओ TAB ऑप्शन वापरून व्हिडीओमद्धे हवे तो songs , ओडीओ , RECORDED आवाज घालू शकतो.
त्यानंतर व्हिडीओच्या खाली जी व्हिडीओ ची फिल्म येते त्यावर touch केल्यानंतर cut , pan , zoom ,audio , volumme , pitch चे ऑप्शन येईल. त्याचा वापर व्हिडीओ मद्धे करा. त्याखाली clip grafics ,speed , reverse , rotate / Mirroring ,color Filter ,Adjesment EQ , Volume envelope ,Reverb , Voice changer ,Vignette ,Extract Audio असे ऑप्शन येईल त्याची माहिती पुढीलप्रमाणे पाहू.
🔸clip grafics द्वारे व्हिडीओ वर काही animated shapes वापरता येईल.
🔸speed द्वारे व्हिडीओ ची speed कमी जास्त करता येईल.
🔸reverse ऑप्शन द्वारे व्हिडीओ मागून पुढे या गतीने चालेल.
🔸Rotate / Mirroring द्वारे आपल्याला video वरून खाली ,डावीकडून उजवीकडे विविध अंशात्मक कोनामाद्धे फिरवता येईल
🔸Color Filter द्वारे व्हिडीओला विविध Color फिल्टर देता येईल. उदा. Warm ,Cold ,Basic , Vivid इत्यादी
🔸Adjesment द्वारे आपल्याला व्हिडीओला हवा तसा Brightness, Contrast , Shadows , Temperature देता येईल.
🔸EQ द्वारे व्हिडीओला Bass Booster , Hip –Hop ,Jazz, Rock ,Normal असा ऑडीओ effect देता येईल.
🔸Volume Envelope द्वारे व्हिडीओ मद्धे हव्या त्या ठिकाणी आवाजात चढ- उतार करता येईल.
🔸Reverb द्वारे Bathroom, Echo Room , Studio ,Cave ,Arena असा voice effect देता येईल.
🔸Voice changer द्वारे व्हिडीओच्या आवाजात बदल करता येईल .उदा. लहान मुलाचा आवाज . kids, Man ,Robot , Computer , Woman यांच्या आवाजात व्हिडीओ
🔸Vignette द्वारे व्हिडीओच्या background मद्ध्ये बदल करता येईल.
🔸Extract ऑडीओ द्वारे व्हिडीओच्या फिल्मखाली audio दिसून येईल.
🔸Information द्वारे व्हिडीओ बद्दल माहिती येईल उदा. Resolution , File Format , Date , Duration इत्यादी.
व्हिडीओ तयार झाल्यानंतर dashboard च्या वर upload बटण आहे त्यावर क्लिक करून हवा तो resolution निवडून व्हिडीओ save करा.उदा. HD 720 ,SD 540P
No comments:
Post a Comment