Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

गूगल फार्म द्वारे quiz

 मित्रांनो, बऱ्याचदा जेव्हा आपणास blackboard अथवा पेपरच वापर न करता विद्यार्थ्यांच्या चाचण्या घ्यायच्या असतात किंवा वर्ग न घेता घरूनच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन परीक्षेद्वारे करायचे असते अशावेळेस  ऑनलाईन प्रश्नमंजुषा हा एक पर्याय उपयुक्त ठरतो परंतू ऑनलाईन प्रश्न पत्रिका कशी तयार करायची यासाठी पुढीलप्रमाणे कृती करून आपणही विद्यार्थ्यांना किती समजले यांचे परीक्षण ऑनलाइन प्रशमंजुषा तयार करून करू शकतो.  

 

1)गुगलवर जाऊन google form सर्च करा.

 

2)पहिल्या क्रमांकाच्या  साईटवर क्लिक करा, personal form ची निवड करा.

 

3)settings मद्धे जाऊन प्रश्नमंजुषा quiz वर क्लिक करा.title ला नाव द्या.फोर्म चे वर्णन करा.

 

4)untitled question वर क्लिक करा.प्रश्न तयार करा

 

5)हवा तो प्रश्नप्रकार निवडा ,बहुपर्यायी प्रश्नासाठी multiple choice हा प्रकार निवडा.पर्याय द्या.

 

6)answer keys वर क्लिक करून प्रश्नाला गुण द्या done करा.

 

7)त्यानंतर + या चिंन्हावर क्लिक करून दुसरा प्रश्न जोडा.उत्तरे लिहा अशारितीने प्रश्नपत्रिका तयार होईल.

 

8)सेंड च्या बाजूला eyes च्या चिंन्हावर क्लिक करून प्रश्नपत्रिका कशी दिसेल ते preview मद्धे पहा.

 

9)प्रश्न तयार झाल्यावर + या चिंन्हावर परत क्लिक करून your name किंवा तुमचे नाव टाका उत्तरे जोडू नका.

 

10)required बटण on करा. your name hold करून सर्वात वर हव्या त्या ठिकाणी  drag करून ठेवा.

 

11)Eyes या वरच्या चिंन्हावर क्लिक करून preview पहा.

 

12)settings मद्धे जाऊन limit to one responce करा म्हणजे test सोडवणारा एकदाच test देऊ शकेल.

 

13)त्यानंतर send या बटनावर क्लिक करा. ज्याला फार्म पाठवायचा आहे त्याला mail ने send करा.

 

14)लिंक या चिंन्हावर क्लिक करून लिंक मिळवा ती कॉपी करा. हव्या त्या ठिकाणी paste करा.

आपली प्रश्नमंजुषा तयार आहे.

 

=========================================================================

 

 

 google form द्वारे प्रश्नमंजुषा कशी तयार करायची ते pdf मधून पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.



 

No comments:

Post a Comment