Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Saturday, August 21, 2021

सूत्रसंचालन


       💢  स्वागतम ! सुस्वागतम ! शुभ स्वागतम.💢

 

व्यासपीठावरील उपस्थित  सर्व मान्यवर ,सर्व शिक्षक त्याचबरोबर यशाचे क्षितीज कवेत घेऊनउत्तुंग  झेप घेण्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत !

 

आज दिनांक ................ ...................................................................च्या प्रांगणात /सभागृहात ........................................चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री /श्रीमती................................................ ......................................................हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. /करते.त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री /श्रीमती .................................................हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो./करते.तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री /श्रीमती ...................................................................हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो./करते.

 

‘संस्कृती आहे आपली प्रकाशाची

शीतलता आहे त्यात चंद्राची

दिपप्रज्व्लाने सुरुवात कार्यक्रमाची

हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची’

किंवा

सुमंगल या वातावरणात

संचारून आली देशभक्ती

मान्यवरांच्या शुभहस्ते

प्रज्वलित कराव्या ज्योती

 

✦अंधकाराला छेदून प्रकाशाकडे झेप  घेणाऱ्या या ज्योतीला सर्व मान्यवरांच्या हस्ते  प्रज्वलित केल जात आहे .मी मान्यवरांना आशी विनंती करतो /करते कि त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी.

 

‘अतिथी देवो भव’ हि आपली भारतीय परंपरा आहे. या परंपरेला अनुसरूनच उपस्थित सर्व वेळात वेळ काढून आलेल्या मान्यवरांचे  स्वागत पुष्पगुच्छ देऊन करूया.

 

सूचना – क्रमाक्रमाने सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे ,आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत असे म्हणावे.

यानंतर आमच्या शाळेतील विद्यार्थींनी एक स्वागत गीत सादर करतील अशी मी  त्यांना सूचना करतो./करते.

 

‘जीवनाचे सार कळते

ग्रंथ आणि पुस्तकातून

कार्यक्रमाचा उद्देश कळतो

प्रास्ताविकातून.’

किंवा

‘प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान

ज्ञानाच्या विषयात शिक्षकांना मान

आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे

प्रास्ताविकाचे ज्ञान’.

 

 

प्रास्ताविक – यानंतर माननीय श्री  ............................................................ यांना मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो.

 

अतिथी व पाहुण्यांचे मनोगत व मार्गदर्शन  घ्यावे.शेवटी अध्यक्षीय भाषण घ्यावे.जसे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणमाननीय  श्री /श्रीमती..............................................हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो./करते.

 

‘प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली

अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली.

आपल्या मार्गदर्शनाने

आम्हाला दिशा मिळाली.

शेवटी आता आभारप्रदर्शनाची वेळ आली.’

 

आभारप्रदर्शन -   प्रस्तुत कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आपण सर्व आलात, प्रस्तुत कार्यक्रमाची शोभा वाढवली.आमच्या सर्व विद्यार्थीमित्रांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केलातत्याबद्दल सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर प्रस्तुत कार्यक्रमांसाठी उपस्थित पालक,विद्यार्थी आपल्या सर्वांचे मनपूर्वकत्याचबरोबर या कार्यक्रमांसाठी ज्यांनी ज्यांनी कळत नकळत मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मानून कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.


महाराष्ट्रातील सूत्रसंचालक शिक्षकांनी /तज्ञांनी सूत्रसंचालक ग्रुप करून व स्वतःचे संचालन आपल्या अनुभवातून आपणासाठी विशीष्टपूर्ण सूत्रसंचालन नमुने PDF तयार केलेत. त्रिवार वंदन त्यांच्या कार्याला .....!!! 


खालील काही सूत्रसंचालनाचे pdf भाग ब्लॉग वर उपलब्ध करून दिले आहेत.ते डाऊनलोड करून घेऊ शकता.



 

No comments:

Post a Comment