Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, March 2, 2021

दिक्षा ऍपचा वापर

 




🔲 दिक्षा अँप हे केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयोगातून निर्माण झालेले शैक्षणीक अधिकृत अँप आहे.दिक्षा ऍप मध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विषयाचे सर्व माध्यमाच्या  पाठ्यपुस्तकातील  QR कोडच्या माध्यमातून इ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.QR कोडसोबत त्या घटकांशी संबंधित इ साहित्य उपलब्ध जोडले गेले आहे.


🔳सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून दिक्षा अँप डाउनलोड करा.



 

screenshot













 

 

🔳दिक्षा अँप डाउनलोड करून इंस्टॉल करा.ते आपल्या मोबाईल तसेच PC वर इंस्टॉल करता येईल.

🔲अँप ओपन करून आवडीची भाषा निवडा आपण ज्या राज्यात राहतो ती भाषा सिलेक्ट करावी.

🔳त्यानंतर  असे SIGH IN व पाहुणा असे दोन पर्याय दिसतील पाहुणा म्हणून brouse करा या टॅब वर क्लिक करा.

🔲त्यानंतर पुढील पेजवर शिक्षक व विद्यार्थी असे दोन टॅब दिसतील शिक्षक हा पर्याय निवडा.

🔳त्यानंतर शाळेचे बोर्ड , माध्यम व इयत्ता निवडा बोर्डच्या माध्यम नुसार विविध e साहित्य पहायला मिळेल.

 

🔲पेजच्या खालील बाजूस QR कोड सिम्बॉल दिसतील तो QR कोड कॅमेरा ने स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर त्या घटकांशी संबंधित साहित्य आपण पाहू शकतो.तसेच उजव्या बाजूला कोपऱ्यातील filter वर क्लिक केल्यावर गरजेनुसार इ साहित्य मिळवू शकतो.

🔳त्यानंतर आपल्याला हवे ते e साहित्य लोड होऊन पहावयास मिळेल .

🔲दीक्षा ऍप तुमच्या पीसी वर वापरण्यासाठी google chrome वर diksha.gov.in टाईप करा. एंटर करा येणाऱ्या विंडो मध्ये पुस्तकात असलेल्या QR कोडचा क्रमांक टाका. कंटेंट लोड होऊन प्ले होईल.CONTENT ऑनलाईन पहायचे असल्यास PLAYकरा. ऑफलाईन पहायचे असल्यास डाउनलोड करा. धनयवाद..!

 





No comments:

Post a Comment