Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, March 2, 2021

4D ईमेज

 

 
 
 
ऑगमेंटेड  रियालिटी  या तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे mobile app ,camera व traker images वापरून  एखादी गोष्ट आभासी सत्य स्वरुपात आपण पाहू शकतो. एखाद्या गोष्टीचा जेव्हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे शक्य नसते ,अश्या वेळीआभासी तंत्रज्ञानाचा(virtual reality वापर आपणही आपल्या वर्गात करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती देऊन त्यांचे संबोध दृढकरून घेऊ शकतो.विदयार्थी व शिक्षक दोहोंना आकर्षित करणारे ऑगमेंटेड व वर्चुअल रिऍलिटी अँप सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत.एखादी रचना ,आकृती,अवयव ,इंद्रिये ,विविध घटक इ. घटक 2D व 3D स्वरूपात पाहता येणे हे आनंददायी असते.विद्यार्थ्यांना शिकतांना फार मजा येईल.लांबी, रुंदी , उंची व जाडी अश्या परिमाणात चित्र सजीव स्वरुपात त्यांना पाहता येईल .
 
 
👉त्यासाठी सर्वप्रथम  गूगल प्ले स्टोर वर जाऊन Animal 4d+  app टाईप करा. व शोधा पाहिया क्रमांकाचे अँप निवडा. डाऊनलोड करून घ्या.
 
👉ज्या मोबाईल मद्धे Animal 4d + हे अँप चालत नाही त्यांनी Animal 4d+ lite version वापरावे.
 

👉App इंस्टाल झाल्यावर  त्याचा कँमेरा ओपन होईल.त्याआधी 4d images आपल्या मोबाईल मद्धे डाऊनलोड करून ठेवा.किंवा त्या चित्राची प्रिंट करून pdf तयार करून ठेवा.
 
 👉या कॅमेरासमोर आपण 4d चे चित्र  pdf मधील असो कि दुसऱ्या मोबाईलमधील असो ते कॅमेऱ्यासमोर धरले कि त्या चित्रातील प्राणी प्रत्यक्षपणे हालचाल करतांना दिसतो व आवाजही काढतो.संबंधित प्राण्यांला आपण स्पर्श करून विविध कोनातून त्याचे निरीक्षण करू शकतो. गोल गोल फिरवू शकतो. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी वरील animal 4d अँप फार उपयुक्त आहे.

👉या अँपच्या उजव्या कोपर्यातील क्रॉस रेषांवर क्लिक करा तिथे विविध प्राणी ,पक्षी आपणास दिसतील ज्या प्राण्यांच्या चित्रावर क्लीक कराल त्या प्राण्यांची माहिती तुमच्यापुढे येईल  त्या प्राण्यांचे नाव ,आवाज इत्यादी प्रत्यक्ष दिसेल 

👉अशाच प्रकारे अवकाशातील संबोध स्पष्ट करण्यासाठी space 4d+ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे हे ऍप डाऊनलोड करा ऍप ओपन करा, स्टार्ट वर क्लिक करा आपणा समोर विविध अवकाशातील,उपग्रह,चंद्र , सूर्यमाला ,ग्रह ,अवकाशयान यांचे दर्शन होईल.या इमेज 4d मध्ये पाहण्यासाठी इमेजला ऍप मधील कॅमेऱ्याने दुसऱ्या मोबाईलमधील सेव्ह इमेजला स्कॅन करा.scan केल्यावर यानाचे प्रत्यक्ष उड्डाण होताना दिसेल.यान अंतराळात पोहचल्यावर हाताने गोल गोल फिरवू शकता description मध्ये माहितीचे वाचन करू शकता, व्हिडिओ सुद्धा तयार करू शकता.तसेच मानवी शरीरातील  आंतरइंद्रिये व त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी Humanoid 4d+ हे ऍप डाऊनलोड करून वापरावे.
 

 

4D इमेज मोबाईलवर स्कॅन करण्यासाठी खालील लिंक PDF च्या नावावर क्लिक करा. 

 

                                                                            PDF 1

PDF 2

 PDF 3

 

 

No comments:

Post a Comment