शब्दसमूहाबद्दल एक शब्द
अरण्याचा राजा – वनराज
अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
आग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र
ईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक
ईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक
भाषण ऐकणारे – श्रोते
ऐकायला व बोलता न येणारा – मुकबधीर
कथा सांगणारा – कथेकरी
कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष
कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यङ्परामुख
कसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ
कविता करणारा – कवी
गाणे गाणारा – गायक
कविता रचणारी – कवियित्री
कमी आयुष्य असलेला – अल्पायू
कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी
कादंबऱ्या लिहणारा – कादंबरीकार
कुस्ती खेळण्याची जागा – आखाडा
केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
कैदी ठेवण्याची जागा – कारागृह
खूप आयुष्य असलेला – दीर्घायुषी
खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
ज्याचे घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात अशी जागा – चौक
चांदण्या रात्रीचा पंधरवाडा – शुद्धपक्ष
चित्रे काढणारा – चित्रकार
जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी – उभयचर
ज्याला आईवडील नाहीत असा – अनाथ
ज्याच्या हातात चक्र आहेत असा – चक्रपाणी
ज्याला मरण नाही असा – अमर
ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
ज्याचा तळ लागत नाही असा – अथांग
ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण – तिठा
दगडाच्या मूर्ती घडवणारा – शिल्पकार
दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
दर पंधरवड्याने प्रसिध्द होणारे – पाक्षिक
दर महिन्याने प्रसिद्ध होणारे – मासिक
दर सहा महिन्याने प्रसिद्ध होणारे – षण्मासिक
दर वर्षाला प्रसिद्ध होणारे – वार्षिक
दुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी
कोणावरही अवलंबून नसलेला – स्वावलंबी
दोन नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण – संगम
देवापुढे सतत तेवणारा दिवा – नंदादीप
धान्य साठवण्याची जागा – कोठार
नदीची सुरुवात होते ती जागा – उगम
होडी चालवणारा – नाविक
पहाटेपूर्वीची वेळ – उष:काल
नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
पाऊस मुळीच न पडणे – अवर्षण
पायापासून डोक्यापर्यंत – अपादमस्तक
पायात जोडे न घातलेला – अनवाणी
पूर्वी कधीही घडले नाही असे – अभूतपूर्व
प्रेरणा देणारा – प्रेरक
फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र
विनामुल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई
बातमी सांगणारा / सांगणारी – वृत्तनिवेदक /वृत्तनिवेदिका
भाषण करणारा – वक्ता
माकडाचा खेळ करून दाखवणारा – मदारी
मूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक
मूर्तीची तोडफोड करणारा – मूर्तिभंजक
मोजता येणार नाही असे – अगणित
महान ऋषी – महर्षी
मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
रक्षण करणारा – रक्षक
रात्रीचा पहारेकरी – जागल्या
रोग्याची शुश्रूषा करणारी – परिचारिका
लग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी
लाखो रुपयाचा धनी – लक्षाधीश
लिहिता- वाचता येणारा – साक्षर
लिहिता वाचता न येणारा – निरक्षर
लोकांचा आवडता – लोकप्रिय
लोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य
लोकांचे नैतृत्व करणारा – लोकनायक
डोंगरकपारीत राहणारे लोक – गिरीजन
वाडवडिलांकडून मिळालेली – वडिलोपार्जीत
विमान चालवणारा – वैमानिक
व्याख्यान देणारा – व्याख्याता
शत्रूकडील बातमी काढणारा – हेर
शिकारीसाठी उंच बांधलेला माळा – मचाण
सतत काम करणारा – दिर्घोद्योगी
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनु
संकट दूर करणारा – विघ्नहर्ता
सांगेल ते काम करणारा – सांगकाम्या
सुखाच्या मागे लागलेला – सुखलोलुप
स्वर्गातील इंद्राची गाय – कामधेनु
स्वत: संपादन केलेली – स्वसंपादित
स्वत: काम न करता खाणारा – ऐतखाऊ
फक्त स्वत:चाच फायदा पाहणारा – स्वार्थी
स्वत:बद्दल अभिमान असलेला – अभिमानी
दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा – उदार
स्तुती गाणारा – भाट
हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
हरिणासारखी डोळे असणारी – हरिणाक्षी ,मृगाक्षी
हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत- आसेतुहिमाचल
No comments:
Post a Comment