Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Monday, November 18, 2024

मतदान यादीत आपला भाग क्रमांक व अनुक्रमांक

💢💢💢💢💢💢💢💢💢💢

 बऱ्याचदा मतदारांना निवडणुकींच्या वेळेस आपले मतदान करतांना आपला भाग क्रमांक व अनुक्रमांक माहिती नसल्यामुळे नाहक त्रास होतो.किंवा विविध कर्मचाऱ्यांना election कर्तव्याचा प्रशिक्षण दरम्यान आपला मतदार अनुक्रमांक व भाग क्रमांक याचे काम पडते.आपला भाग क्रमांक माहीत नसल्यामुळे मतदारांना एकाच गावातील विविध केंद्रावर माहितीअभावी फिरावे लागते.त्यामुळे मतदारांचा वेळ व श्रम दोन्हीही खर्च होतो.

यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने voterhelpline नावाचे ॲप खास नागरिकांसाठी विकसित केलेले आहे. हे ॲप डाऊन लोड केल्यावर लॉगिन करावे किंवा skip लॉगिन करून केवळ मतदारांचा एपिक क्रमांक माहिती असल्यास तो सर्च बॉक्स वर टाकावा . ईपिक क्रमांक टाकल्याबरोबर मतदारांचे अनुक्रमांक ,नाव व भाग क्रमांक प्रदर्शित होईल.त्या आधारे मतदारांना आपले वोटिंग केंद्र शोधण्यास मदत होईल. याशिवाय या ॲप च्या मदतीने नवीन फॉर्म नोंदणी, इपिक कार्ड दुरूस्ती इत्यादी अनेक कामे करता येतात.

👇👇👇👇👇👇

खाली voterhelpline ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहेत.

👉CLICK HERE

No comments:

Post a Comment