Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Sunday, September 26, 2021

शब्दांच्या जाती

 

शब्दांच्या चार जाती आहेत.

अ )नाम

आ} सर्वनाम

इ) विशेषण

ई) क्रियापद

 

त्यापैकी नाम म्हणजे काय ते शिकूया.

नाम – कोणत्याही दृश्य – अदृश्य , सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात.

 

नामांची पुढील उदाहरणे आहेत.

फुलांची नावे , फळांची नावे ,पक्ष्यांची नावे , जंगली प्राण्यांची नावे , पाळीव प्राण्यांची नावे , नद्यांची नावे , पर्वतांची नावे , वस्तूंची नावे , मुलांची नावे , मुलींची नावे , देशांची नावे , धान्यांची नावे , ग्रह ,नक्षत्रे ,व ताऱ्यांची नावे , काल्पनिक नावे , गुणांची नावे , मनाच्या स्थितीची नावे , ऋतूंची नावे , झाडांची नावे , कीटकांची नावे , राज्यांची नावे , जिल्ह्याची नावे , डाळीची नावे , महिन्यांची नावे .

 

आ) सर्वनाम

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

 

१ ) विपिन खूप अभ्यास करतो.

२ ) तो सुदृढ आहे.

वरील दुसऱ्या वाक्यात तो हा शब्द ‘ विपिन ‘ या नामाऐवजी वापरला आहे.

उदाहरणे – म्ही , आम्ही , तू , तुम्ही , तो, ते , त्या , हा , ही , हे , ह्या , जो , जी , जे , ज्या , कोण , काय , आपण , स्वतः हि मराठीतील सर्वनामांची उदाहरणे आहेत.

 

इ ) विशेषण

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

 

१ ) हिरवी पाने ( पाने कशी ? – हिरवी )

२ ) लाल गुलाब ( गुलाब कसा ? – लाल )

३ ) भव्य इमारत ( इमारत कशी ? – भव्य )

हिरवी , लाल , भव्य हे शब्द त्या नामाबद्दल माहिती सांगतात म्हणून ती विशेषणे आहेत.

 

ई) क्रियापद

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

१ ) मी पाणी पितो.

२ ) मी अभ्यास करतो.

३ ) मी अन्न खातो.

पितो – खाण्याची क्रिया

करतो – करण्याची क्रिया

खातो – खाण्याची क्रिया 

 

‘ खातो ,पितो ,करतो ‘हे क्रिया दर्शवणारे शब्द आहेत ते वाक्यांचा अर्थ पूर्ण करतात म्हणून ते क्रियापद आहेत.

No comments:

Post a Comment