Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Monday, November 18, 2024

मतदान यादीत आपला भाग क्रमांक व अनुक्रमांक

💢💢💢💢💢💢💢💢💢💢

 बऱ्याचदा मतदारांना निवडणुकींच्या वेळेस आपले मतदान करतांना आपला भाग क्रमांक व अनुक्रमांक माहिती नसल्यामुळे नाहक त्रास होतो.किंवा विविध कर्मचाऱ्यांना election कर्तव्याचा प्रशिक्षण दरम्यान आपला मतदार अनुक्रमांक व भाग क्रमांक याचे काम पडते.आपला भाग क्रमांक माहीत नसल्यामुळे मतदारांना एकाच गावातील विविध केंद्रावर माहितीअभावी फिरावे लागते.त्यामुळे मतदारांचा वेळ व श्रम दोन्हीही खर्च होतो.

यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने voterhelpline नावाचे ॲप खास नागरिकांसाठी विकसित केलेले आहे. हे ॲप डाऊन लोड केल्यावर लॉगिन करावे किंवा skip लॉगिन करून केवळ मतदारांचा एपिक क्रमांक माहिती असल्यास तो सर्च बॉक्स वर टाकावा . ईपिक क्रमांक टाकल्याबरोबर मतदारांचे अनुक्रमांक ,नाव व भाग क्रमांक प्रदर्शित होईल.त्या आधारे मतदारांना आपले वोटिंग केंद्र शोधण्यास मदत होईल. याशिवाय या ॲप च्या मदतीने नवीन फॉर्म नोंदणी, इपिक कार्ड दुरूस्ती इत्यादी अनेक कामे करता येतात.

👇👇👇👇👇👇

खाली voterhelpline ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहेत.

👉CLICK HERE

Sunday, September 8, 2024

Friday, November 17, 2023

शालार्थ वरून पगार स्लिप डाउनलोड कशी करावी?



सर्वप्रथम आपल्या संगणकावर adress bar मध्ये किंवा आपल्या मोबाईल मधील chrome ब्राउजर वर  

 👉shalarth.maharashtra.gov. in असे टाईप करावे.

त्यानंतर पहिल्या लिंकवर क्लिक करावे.लॉगिन पेज ओपन होईल. username मध्ये आपला शालार्थ ID टाकावा तो प्रत्येक शिक्षकांकडे असतो. आणि पासवर्ड मध्ये ifms123 असा डिफाल्ट पासवर्ड टाकावा.

Capcha कोडं टाकून सबमिट करावे.त्यांनतर

👉Old passward

👉New Passward

👉Confirm Passward

असे पेज ओपन होईल. Old passward मध्ये आपला default passward ifms123 टाकावा.

New Passward हा तयार करावा नंतर confirm पासवर्ड करावे.

नवीन पासवर्ड तयार झाल्यावर तो passward लॉगिन करतांना वापरायचा आहे.लॉगिन झाल्यावर worklist मध्ये जाऊन employee corner मध्ये  जावेत.नंतर employee slip वर क्लिक करा नंतर month सिलेक्ट करून कोणत्या वर्षाची स्लिप पाहिजे हे पाहण्यासाठी year निवडावे.


View salary slip वर क्लिक करून सॅलरी स्लिप ओपन होईल ती डाउनलोड करून घ्यावी.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Saturday, April 22, 2023